नद्यांनी धोक्याची पातळी गाठली

0

रत्नागिरी : जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, कोदवली, शास्त्री, सोनवी, मुचकुंदी आणि बावनदी या प्रमुख नद्या आहेत. यातील काही नद्यांनी धोक्याची पातळी गाठली जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर, इशारा पातळी 6 मीटर असून, रविवारची पाणी पातळी 8.40 मीटर होती. वाशिष्ठी नदी धोका पातळी 7 मीटर, इशारा पातळी 5 मीटर असून पाणी पातळी 4.60 मीटर होती. काजळी नदी धोका पातळी 18.50 मीटर, इशारा पातळी 16.50 मीटर आणि पाणी पातळी 15.95 मीटर होती. कोदवली नदी धोका पातळी 8.13 मीटर, इशारा पातळी 4.90 मीटर आणि पाणी पातळी 5.70 मीटर. शास्त्री नदी धोका पातळी 7.80 मीटर, इशारा पातळी 6.20 मीटर आणि आजची पातळी 5.30 मीटर. सोनवी नदी धोका पातळी 8.60 मीटर, इशारा पातळी 7.20 मीटर आणि पाणी पातळी 5.10 मीटर. मुचकुंदी नदीची धोका पातळी 4.50 मीटर, इशारा पातळी 3.50 मीटर आणि पाणी पातळी 3.20 मीटर आणि बावनदी धोका पातळी 12 मीटर, इशारा पातळी 10.40 मीटर आणि रविवारची पाणी पातळी 9.90  मीटर इतकी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here