कोरोना व्हायरस: ‘जनता कर्फ्यू’ आणि मोदींच्या भाषणातले 9 मुद्दे

0

पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-

  1. कोरोनाबद्दल निश्चिंत राहू नये. इतर देशांमध्ये सुरुवातीच्या दिवसांनंतर रुग्णांचा जणू स्फोट झाला.
  2. आपल्या देशात 130 कोटी लोक आहेत. आपल्यासाठी हे संकट सामान्य नाही. जर विकसित देशांमध्ये एवढा परिणाम होतोय, तर भारतात होणार नाही, असं समजू नये.
  3. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे: संकल्प आणि संयम. आपण संकल्प करूया की मी संक्रमित होणार नाही आणि इतरांना होऊ देणार नाही. गर्दीपासून दूर राहून संयम दाखवूया.
  4. येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. शक्य होईल तोवर घरातूनच काम करा.
  5. वरिष्ठ नागरिकांनी घराबाहेर अजिबात पडू नये. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी घरातच थांबावे.
  6. येत्या रविवारी, 22 मार्चला ‘जनता कर्फ्यू’ पाळूया. हा जनतेने जनतेसाठी लावलेला कर्फ्यू. त्या दिवशी सकाळी 7 ते रात्री 9 घराबाहेर पडायचं नाही.
  7. येत्या रविवारी संध्या. 5 वाजता सायरनचा आवाज होईल. तेव्हा आपण दारात, खिडकीत, बाल्कनीत उभे राहून सरकारी कर्मचाऱ्यांचे, डॉक्टरांचे आभार मानूया. टाळ्या वाजवून, घंटी वाजून आभार मानूया.
  8. कोविडचा सर्वांना आर्थिक फटक बसलाय. श्रीमंतांना आवाहन करतो की कर्मचाऱ्यांची काळजी घ्या. त्यांचा पगार कापू नका. त्यांनाही त्यांचं कुटुंब चालवायचंय.
  9. देशात दूध, अन्नधान्य, औषधं यांचा तुटवडा निर्माण होऊ नये, म्हणून पावलं उचलत आहोत. घाबरून जाऊन साठेबाजी करू नका. या सर्व गोष्टी या पुढेही मिळत राहतील.

लोकांनी गर्दीमध्ये जाळणं टाळलं पाहिजे. कोरोना व्हायरसच्या या संकटात सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आणि उपयोगी आहे. लोकांनी कर्तव्याचं पालन करण्याचा संकल्प आणि संयम बाळगला तर आपण या संकटावर मात करु शकू असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here