आयपीएल 2022 : चेन्नई-पंजाबमधील सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल

0

चेन्नई आणि पंजाबमधील सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला आहे. मयांकच्या नेतृत्वातील पंजाब संघ सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. तर चेन्नईचा संघ नवव्या स्थानावर आहे.

त्याशिवाय दिल्ली आणि कोलकाता संघाला एका एका स्थानाचे नुकसान झालेय. गुणतालिकेत टॉप-5 स्थानामध्ये कोणताही बदल झालेला नाही. हार्दिक पांड्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स अव्वल स्थानावर कायम आहे.

हार्दिक पांड्या नेतृत्वातील गुजरात संघाचा फक्त एक पराभव झाला आहे. सात सामन्यात सहा विजय मिळवत 12 गुणांसह गुजरातचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत गुजरातचा संघ प्रथम स्थानावर आहे. तर सनराइजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल आणि लखनौ संघ दहा दहा गुणांसह टॉप पाचमध्ये आहेत. मयांकच्या नेतृत्वातील पंजाबसंघ आठ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे…

पाहा गुणतालिका

क्रमांकसंघसामनेविजयपराभवनेट रन रेटगुण
1गुजरात7610.39612
2हैदराबाद7520.69110
3राजस्थान7520.43210
4लखनौ8530.33410
5आरसीबी853-0.47210
6पंजाब844-0.4198
7दिल्ली7340.7156
8कोलकाता8350.0806
9चेन्नई826-0.5384
10मुंबई808-1.0000

गुणतालिक गुजरात संघ अव्वल आहे. पण पर्पल आणि ऑरेंज कॅपवर राजस्थानच्या खेळाडूंनी कब्जा केला आहे. ऑरेंज कॅप जोस बटलरकडे आहे तर पर्पल कॅप यजुवेंद्र चहलच्या डोक्यावर आहे…

ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत कोण आहे?

क्रमांकफलंदाजसामनेधावासरासरीस्ट्राईक रेट
1जोस बटलर749181.83161.51
2केएल राहुल836861.33147.798
3शिखर धवन830243.14132.45
4हार्दिक पांड्या629573.75136.57
5तिलक वर्मा827245.33140.20
6फाफ डु प्लेसिस825531.88130.10

पर्पल कॅपसाठी कोण कोण दावेदार?

क्रमांकगोलंदाजसामनाविकेटगोलंदाजी सरासरीइकनॉमी रेट
1युजवेंद्र चहल71811.337.28
2टी नटराजन71514.538.07
3ड्वेन ब्रावो81418.508.73
4कुलदीप यादव71317.388.47
5उमेश यादव81121.637.43

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:19 PM 26-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here