नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील चौघा दोषींना आज पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. हे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी हरिनगरच्या पंडीत दिनदयाल उपाध्याय रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तुरुंगातील नियम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही एक प्रक्रिया असते. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील. फाशी दिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी दिली. शवविच्छेदनानंतर मृतदेह घरच्या मंडळींकडे अंतिम संस्कारासाठी देण्यात येतील. जर कुटुंबिय मृतदेह घेण्यासाठी आले नाही तर चारही गुन्हेगारांच्या मृतदेहावर कारागृहातच अंत्यसंस्कार करण्यात येतील. ज्या जेल क्रमांक ३ मध्ये ही फाशी देण्यात आली त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
