नागपुरातील हॉटेल्सवर गृहमंत्र्यांनी टाकली धाड

0

नागपूर : करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने राज्यातील सर्व हॉटेल्स बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, हा आदेश धुडकावून लावत हल्दीराम सह इतर काही हॉटेल्स सुरू होते. त्यामुळे खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी 19 मार्च रोजी धाड टाकून कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय आणि अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. करोना विषाणूमुळे देशात आतापर्यंत 4 जणांचे मृत्यू झाले असून महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 49 वर पोहोचली आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग अजून वाढू नये त्या पार्श्वभूमीवर अनेक प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व दारुची दुकान, बार, हॉटेल्स, क्लबना सूचना दिल्या आहेत. परंतु, नागपुरात हल्दीरामसह काही हॉटेल्स गुरुवारी सुरू होते. सदरमधील हल्दिराममध्ये ग्राहकांना नास्ता व अन्य खाद्य पदार्थ विक्री करण्यात येत असल्याची तक्रार गृहमंत्री देशमुख यांच्याकडे आली. गुरुवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास देशमुख यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना रवीभवन येथे बोलाविले. त्यानंतर देशमुख यांच्या वाहनातूनच दोन्ही अधिकारी सदरमधील हल्दिराम येथे गेले. मुख्य दरवाजाच बंद होता. बाजूलाच असलेल्या छोट्या दरवाजातून देशमुख व दोन्ही अधिकारी हल्दिराममध्ये गेले. यावेळी व्यवस्थापक बिल तपासणी करीत होता. देशमुख यांनी बिल तपासले असता सकाळी ग्राहकांना नास्ता देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर व्यवस्थापक व संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले. सदर परिसरात कारवाई केल्यानंतर देशमुख यांचा ताफा बजाजनगरमध्ये धडकला. देशमुख यांनी सुजल सावजी भोजनालयात छापा टाकला. भोजनालय बंद असल्याचे मालकाने सांगितले. पाहणी केली असता एक ग्राहक जेवताना दिसला. तसेच स्वयंपाक घरात 100 माणसांचे जेवण बनत असल्याचेही देशमुख यांना आढळून आले. त्यानंतर देशमुख यांनी बजाजनगर पोलिसांनी सुजल सावजीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी रात्री उशिरा बजाजनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here