जि. प. आदर्श शाळा पुरस्कार वितरण रद्द

0

रत्नागिरी : जि. प. च्या आदर्श शाळा पुरस्कार वितरण कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. २० मार्च रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण भागातील आदर्श शाळा पुरस्कार गेल्या आठवड्यात शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी जाहीर केले होते. एकूण २७ शाळांना हे पुरस्कार मिळाले होते. या पुरस्कारांचे वितरण आज २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता जि. प. च्या लोकनेते शामरावजी पेजे सभागृहात होणार होते. मात्र कोरोनामुळे हे वितरण रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी दिली.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here