पत्नीचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

0

खेड : पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत तिचा काठीने आणि दगडाने ठेचून खून करणाऱ्या आरोपीला खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. आवटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

प्रदीप खोचरे असे या आरोपीचे नाव असून ही घटना 2015 साली तालुक्यातील निळीक या गावी घडली होती.
खेड तालुक्यातील निळीक येथे राहणारा प्रदीप खोचरे हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यातून त्या दोघांचे सतत वादाविवाद होत असत. 16 जून 2015 रोजी सकाळी प्रदीपची पत्नी प्रातःर्विधीसाठी गेली होती. तेव्हा प्रदीपच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले. तो पत्नीच्या मागोमाग गेला. त्यावेळी पत्नी बेसावध होती. त्याच अववस्थेत त्याने तिच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली. जखमी अवस्थेत असताना खाली पडली असता प्रदीपने तिच्या डोके दगडाने ठेचून तिचा निर्घृण खून केला.

खेड पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक जांभळे यांना याबाबत माहिती मिळताच, त्यांनी आरोपी प्रदीपला अटक केली. त्याच्याविरोधात 302 अन्वये गुन्हा दाखल केला. प्रदिपविरोधातील हा खटला आज खेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधिस ए. एस. आवटे यांच्या समोर सुनावणीस आला असता सरकारी वकील मृणाल जाडकर, यांनी केलेला युक्तिवाद, तपासलेले 17 साक्षीदार, वकील मृणाल जाडकर यांनी मांडलेले परिस्थितीजन्य पुरावे गृहित धरून न्यायाधीश ए. एस. आवटे यांनी आरोपी प्रदीप खोचरे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या घटनेचा तपास अंमलदार श्री.पोलीस निरिक्षक श्री अशोक जांभळे, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती. निशा जाधव यांनी केला. तसेच कोर्ट पैरवी श्री. अजय इदाते आणि श्री. मर्चडे यांनी या कामी सहकार्य केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:31 AM 27-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here