खोंडे येथे क्लिनिकला आग लागून लाखोंचे नुकसान

0

खेड : तालुक्यातील खोंडे गावात गणेश नगर येथील सुमन पार्क येथे मंगळवार, दि. २६ रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास साई क्लिनिक या दवाखान्याला अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

IMG-20220514-WA0009

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, खेड-खोंड मार्गावर गणेश नगर येथील सुमन पार्कमध्ये सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास साई क्लिनिक या डॉ. उमेश कांबळे यांच्या बंद दवाखान्यातून धूर येऊ लागला. या गाळ्यात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने दवाखान्यातील पार्टीशन व अन्य साहित्य जळून खाक झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here