महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांनी गाठली पन्नाशी

0

‘करोनाची लागण झालेल्या क्रिटिकल रूग्णांचा शंभर टक्के खर्च महाराष्ट्र शासन करत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत क्रिटिकल केअर मध्ये लागणार खर्च देण्यात येत आहे,’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला एक दिलासादायक बातमी दिली. ते म्हणाले, ’राज्यातील पाच कोरोनाग्रस्त बरे होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती टोपे यांनी दिली. मात्र पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाली असून मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात प्रत्येकी एक रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 52 वर गेली असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here