चीनपेक्षा इटलीत कोरोनाच्या बळींची संख्या अधिक

0

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत या व्हायरसमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या या व्हायरसमुळे आतापर्यंत दहा हजारांपेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. डिसेंबरमध्ये चीनमध्ये पहिला कोरोना बाधित आढळून आला होता. चीन केंद्र असलेल्या या जीवघेण्या व्हायरसमुळे सर्वाधित मृत्यू चीनमध्ये नाहीतर इटलीमध्ये झाले आहेत. आतापर्यंत कोरोमामुळे सर्वाधित मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत चीन सर्वात पहिल्या स्थानावर होता. परंतु, इटलीमध्ये या व्हायरसचा प्रकोप जास्त पाहायला मिळत असून इटलीमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत या व्हायरसमुळे 10,041 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले असून त्यांची संख्या 3405 एवढी आहे. तर कोरोनाचे केंद्र असलेल्या चीनमध्ये आतापर्यंत 3248 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतरही देशांत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. इराण 1284, अमेरिका 214 आणि स्पेनमध्ये 831 लोकांना मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाला आहे. तर जगभरात 245,073 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here