”चीनचे पाप जगाला भोगावे लागत आहे ” : डोनाल्ड ट्रम्प

0

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने जगावर शट डाऊन करण्याची वेळ आणली आहे. अमेरिकेमध्ये तर मंदीची घोषणाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना करावी लागली आहे. जगभरात आतापर्यंत दहा हजाराच्या वर मृत्यू झाले असून हे पाप चीनचेच असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. चीनी व्हायरस अशी टीका केल्यानंतर चीन खवळला होता. आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये महासत्ता बनण्यावरून नेहमीच शीतयुद्ध होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे संबंध ताणले गेलेले होते. आता त्यात कोरोना व्हायरसची भर पडली आहे. कोरोनाने अमेरिका, युरोपला चांगलेच नामोहरम केले आहे. या व्हायरसची उत्पत्ती झालेल्या चीनमध्ये हा व्हायरसचा उद्रेक आटोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी चीनवर गंभीर आरोप केला आहे. ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसला चीनी व्हायरस असे हिणविले आहे. जग चीनच्या कर्माची फळे भोगत आहे, अशी गंभीर टीका त्यांनी केली आहे. चीनने योग्य वेळीच कोरोना व्हायरसची माहिती दिली असती तर चीनमध्येच त्याला रोखता आले असते. त्यांनी सूचना न दिल्याने जगावर ही वेळ आल्याचे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेमध्ये आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला असून सैन्यालाही रस्त्यावर उतरावे लागले आहे. महत्वाचे म्हणजे ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी व्हायरस संक्रमणावर ताबा मिळविल्याने चीनची स्तुती केली होती. मात्र, आता या व्हायरसमुळे अमेरिकेमध्ये हाहाकार उडाल्यामुळे ते संतापले आहेत. यामुळे ट्रम्पच कोरोनाला चीनी व्हायरस नावाने संबोधत आहेत. अमेरिकेमध्ये १४००० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. अमेरिका हा कोरोनाचा प्रकोप झालेला सहावा सर्वात मोठा देश ठरला आहे. आता चीनला मागेटाकत इटली सर्वाधिक कोरोना बळींचा देश ठरला आहे. अमेरिकेमध्ये २१८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतामध्ये पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. युरोपमध्ये १ लाखावर लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here