बॅडमिंटन स्पर्धेत रत्नागिरीच्या रोमित कलगुटकरची चमकदार कामगिरी

0

संगमेश्वर : संगमेश्वर तालुका बॅडमिंटन असोसिएशन तर्फे देवरुख येथील बाळासाहेब पित्रे संकुलात देवरुख बॅडमिंटन क्लब ने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन मानांकन स्पर्धेत रत्नागिरी च्या रोमित संदेश कलगुटकर याने 15 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुले या गटात अजिंक्यपद पटकावले तर 19 वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

रोमित सध्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कुल उद्यमनगर मध्ये आठवी च्या वर्गात शिकत असून, त्याला अमित मुळे, सुधीर बाष्टे व तसेच सर्वकश विद्यालय च्या बॅडमिंटन संस्थेचे सुधीर कन्नूर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:03 AM 28-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here