देशात कोरोनाने घेतला पाचवा बळी

0

देशात आणखी एका करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या पाच झाली आहे. तर करोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या २०१वर पोहोचली आहे. जयपूरमध्ये ६९ वर्षीय महिला इटलीतून पर्यटनासाठी भारतात आली होती. तिची तपासणी केली असता करोनाचे निदान झाले होते. यानंतर तिच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. यादरम्यान तिचा मृत्यू झाला. मात्र, ती इराणी महिला बरी झाली असून तिचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा हॉस्पिटलच्या प्रशासनाने केला आहे. दरम्यान, देशातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या आता २०१वर पोहोचली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here