रत्नागिरीत सर्वधर्मियांचा सलोखा कायम राखत गुण्यागोविंदाने साजरे होणार सण

0

रत्नागिरी : पोलीस मुख्यालयात पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दि. 3 मे रोजी रमजान ईद, अक्षय तृतिया हे दोन सण साजरे करण्यात येणार आहेत. हिंदू-मुस्लीमांसह सर्व समाज येथे एकोप्याने राहतात. शेकडो वर्षांची ही परंपरा कायम ठेवत सर्वांनी उत्साहात सण साजरे करावे असे आवाहन डॉ. गर्ग यांनी उपस्थितांना केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष अमोल श्रीनाथ यांनीही रत्नागिरीत हिंदू-मुस्लीम बांधव लहानपणापासून एकत्रित रहात आहे. भोंग्याचा आवाज मर्यादीत झाल्यास मनसेचा कोणताही आक्षेप नाही. आम्ही सर्व समाजाचे बांधव एकत्रितपणे आमचे सण, उत्सव साजरे करणार असल्याचे स्पष्ट केले.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध धर्माचे, जातीचे लोक वास्तव्याला आहेत. परजिल्ह्यासह राज्यात, देशात कोणतीही अनुचित घडली तरीही येथील सर्वधर्मियांचा सलोखा यापूर्वीही कायम राहिला आहे, यापुढेही कायम राहील असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.

शांतता समितीच्या बैठकीला श्री देव भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्ना सुर्वे, भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, कर्मचारीनेते सुधाकर सावंत, पत्रकार राजेंद्र चव्हाण, हेमंत वणजू, आरपीआयचे एल.व्ही.पवार, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष निलेश भोसले, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक महेश गुंदेचा, मराठा मंडळाचे पदाधिकारी केशवराव इंदुलकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर तर पोलीस उपअधिक्षक (गृह) एस.एल.पाटील, शहर पोलीस निरीक्षक विनित चौधरी, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, महेश कुबडे आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:23 AM 28-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here