एलन मस्क आता खरेदी करणार कोका-कोला कंपनी

0

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर खरेदी केल्यानंतर आता उद्योजक एलन मस्क यांची नजर कोका-कोला कंपनीवर आहे.
एलन मस्क यांनी आपण कोका-कोला कंपनी खरेदी करणार असल्याचे ट्वीट करून सांगितले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ट्वीटरला खरेदी केल्याचे कारण मस्क यांनी दिले होते. त्यानंतर आता कोका-कोला कंपनी खरेदी करण्यासाठी देखील एक कारण मस्क यांनी दिले आहे. मस्क यांच्या कोका-कोला कंपनी खरेदीच्या ट्वीटला एका तासात 8 लाख लोकांनी लाइक केले आहे.

एलन मस्क यांनी ट्वीट करत म्हटले की, मी कोका-कोला कंपनी खरेदी करणार आहे. कोका-कोलामध्ये पुन्हा एकदा कोकेनचा वापर करता यावा यासाठी कंपनी खरेदी करणार असल्याचे मस्क यांनी सांगितले. मस्क यांच्या ट्वीटवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया युजर्सकडून येत आहे.

एलन मस्क यांनी ट्वीटर खरेदी करण्यासाठी 44 अब्ज डॉलर (जवळपास 3368 अब्ज रुपये) खर्च करण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी काम करणे आवश्यक आहे. ट्वीटरवर मानवी आयुष्याच्या भवितव्यावर चर्चा होत असते. ट्वीटरमध्ये आगामी काळात अनेक फीचर्स आणणार असल्याचे मस्क यांनी सांगितले.

1886 मध्ये कोका-कोला कंपनीची स्थापना
अमेरिकेतील जॉर्जियामध्ये 1886 मध्ये कोका-कोला कंपनीची स्थापना झाली होती. John Pemberton यांनी ही कंपनी स्थापन केली होती. सन 1887 मध्ये 2300 डॉलर आसा ग्रिग्स कँडलर यांनी खरेदी केली होती. आज जवळपास 200 देशांमध्ये कोका-कोला कंपनीचा व्यवसाय असून एक आघाडीची बहुराष्ट्रीय शीतपेय कंपनी आहे. या कंपनीत 7 लाखांहून अधिकजण काम करत आहेत. भारतासह काही देशांमधील स्थानिक बाजारातील शीतपेय कंपन्यांना ताब्यात घेत कोकाकोलाने त्या देशातील बाजारपेठांवर वर्चस्व निर्माण केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:32 PM 28-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here