संत शिरोमणी श्री सेनाजी महाराज यांची 722 वी जयंती रत्नागिरीत मोठ्या उत्साहात साजरी

0

रत्नागिरी : नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री सेनाजी महाराज यांची 722 वी जयंती माधव सभागृह साळवी स्टॉप रत्नागिरी येथे शेकडो समाज बांधव भगिनी बाळ गोपाळ व आबालवृद्ध यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडली.

श्री सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ह्या नंतर सेनाजी महाराजांची आरती व अभंग यांचे स्तवन करण्यात आले. शिशु रूपातील सेनाजी महाराज यांना पाळण्यात घालून महिलां च्या हस्ते मोठ्या भक्तीने व प्रेमाने जोजवण्यात आले. तदनंतर सुश्राव्य भजनाने व श्री सेनाजी महाराज यांच्या जय घोशाने अवघा परिसर दणाणून गेला. ह्या मंगलमय कार्यक्रमाचे औचित्य साधून विवाह नोंदणीचा कार्यक्रम पार पडला.

रत्नागिरी चे नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री निशिकांत महादेव जाधव, सुनील चव्हाण, पांडुरंग मोरे, दिनेश चव्हाण, पंकज कदम, मोहन हातखंबकर, सोमनाथ रूनकर, समीर चव्हाण, प्रसाद चव्हाण, मंदार चव्हाण, पांडुरंग चव्हाण, संकेत महाले, भाया कदम, दिनेश चव्हाण, रुपेश चव्हाण, सौ निकिता जाधव, अश्विनी चव्हाण, नेहा पवार, पूजा पवार, प्रियांका चव्हाण, निधी चव्हाण, श्वेताली चव्हाण, प्रियांका मोरे, सुप्रिया चव्हाण, वनिता चव्हाण, प्रिया पवार, सानिका चव्हाण व श्री विनायक हातखांबकर श्री व सौ सतीश हातखांबकर श्री अमोल पवार श्री संतोष यादव सोबत शेकडो नाभिक बंधू भगिनींनी श्री सेनाजी महाराजांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:18 PM 28-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here