जिल्ह्यात मुसळधार पाऊस

0

रत्नागिरी : गत दोन दिवसांत सतत पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. नद्या-नाले यांना आलेला पूर आणि खाडी-समुद्र यांना येणार्‍या भरतीचे पाणी शेती आणि रहिवासी भागात शिरत असल्याने संपूर्ण जिल्हा जलमय झाला असून, चहूकडे पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान, पाऊस आणि जोरदार वारा यामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून, नुकसान झाले आहे. जिल्ह्यात 4 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत एकूण 1382 मि.मी. व सरासरी 153.56 मि.मी. पाऊस झाला आहे.  सर्वाधिक पावसाची नोंद दापोली तालुक्यात 225 मि.मी. तर सर्वात कमी पावसाची नोंद गुहागर तालुक्यात 81 मि.मी. झाली आहे.  मंडणगड तालुक्यात 170 मि.मी., दापोली 225 मि.मी., खेड 165 मि.मी., गुहागर 81 मिमी, चिपळूण 158 मिमी, संगमेश्‍वर 180 मिमी, रत्नागिरी 113 मिमी, लांजा 170 मिमी आणि राजापूर तालुक्यात 120 मिमी पाऊस झाला आहे. दापोली तालुक्यात मौजे पांगारी येथील उमेश खैरे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 30 हजार रुपयांचे नुकसान, मौजे जुईकर येथील सुधीर काशीनाथ चौधरी यांच्या घराचे पावसामुळे 3 हजार 400 रुपयांचे अशंत: नुकसान, मौजे आसूद येथील सुभद्रा जाधव यांच्या घराचे 1 हजार 500 रुपयांचे अंशत: नुकसान, मौजे तामसतीर्थ येथील रंग बाजकर यांचे घराचे 50 हजाराचे तर रमेश वजीर यांच्या घराचे 50 हजार रुपयांचे अंशत: नुकसान, मौजे करजगाव येथील रस्त्याचे साईट पट्टी वाहून गेल्याने अंशत: 2 लाख 50 हजाराचे नुकसान, मौजे मुकदावाडी येथील काजवे नदीवरील पूल वाहून गेल्याने अंशत: 3 लाखाचे नुकसान, मौजे कर्दे मुरुड येथील समुद्र किनारी रस्ता खचला आहे. मौजे आंजार्ले येथील रुपेश बोरकर यांच्या घराचेअशंत: नुकसान, मौजे जालगाव येथील जालगावंकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 20 हजारांचे नुकसान, मौजे गावतळे येथील श्रीकांत पवार यांच्या घराचे पावसामुळे अंशत:  30 हजार रुपयांचे नुकसान, मौजे फणगूस येथील सभागृहावर झाड पडल्याने अशंत: 6 हजार रुपयांचे नुकसान, मौजे कुंभवे येथील रुपाली महादेव शिर्के यांच्या घराचे पावसामुळे 5 हजार 800 रुपयांचे नुकसान, मौजे रोरवी येथील श्रीराम मांडवकर यांच्या घराचे पावसामुळे 11 हजार रुपयांचे अशंत: नुकसान,  मौजे कोळबांद्रे येथील महादेव कळबंकर यांच्या घराचे पाऊसामुळे 4 हजार 500 रुपयांचे नुकसान, मौजे पावणाळ येथील अर्जुन बाबाजी वाणी यांच्या घराचे पावसामुळे अंशत:  2 हजार780 रुपयांचे नुकसान, मौज आडखळ लाडघर रस्त्याच्या कडेला समुद्राच्या उधाणामुळे रस्त्याची साईडपट्टी तुटली असून एकेरी वाहतूक सुरु आहे. खेड येथे शनिवारी जगबुडी नदीच्या पातळी वाढ झाल्याने हा पूल वरील वाहतूक बंद होती, पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली आहे. शिवतर येथील अशोक पेठे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 9 हजार  500 रुपयांचे नुकसान, आंबोली येथील अनिल राणे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 1 हजार 600 रुपयांचे नुकसान, मौजे चोरवणे येथील शांताराम शिंदे यांच्या घराचे पावसामुळे 5 हजार रुपयांचे नुकसान,  केशव शिंदे यांच्या घराचे 10 हजार रुपयांचे अंशत: नुकसान, मौजे आंबे येथील बबन सखाराम बाईत यांच्या घराचे पावसामुळे 3 हजार रुपयांचे अंशत: नुकसान, सुनदा गोसावी यांच्या घराचे 2 हजार 500 रुपयांचे नुकसान, आशिफ हुसनी यांच्या घराचे पावसामुळे 5 हजार 800 रुपयांचे अंशत: नुकसान, चिंचघर कोरेगाव येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यात वाशिष्ठी नदीची पाणी पातळी वाढल्याने पुल वरील वाहतूक बंद केली होती. पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली आहे. संगमेश्‍वर तालुक्यात मौजे गोळवली-करजुवे रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद आहे. दरड हटविण्याचे काम सुरु आहे. मौजे कोसुब येथील नरेंद्र भोसले यांच्या घराचे पावसामुळे 8 हजाराचे नुकसान, फणसवणे येथील मनोहर कदम यांच्या घराचे पावसामुळे 30 हजार रुपयांचे अंशत: नुकसान, नवेलेवाडी येथील विष्णू हरी नवेले यांच्या घराचे अशंत: 12 हजार 600 रुपयांचे नुकसान, शेबवणे येथील बंद घराची पडवी अंशत: 50 हजाराचे नुकसान, पिंरदवणे येथे दशरथ रामचंद्र घेवडे यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात नाचणे रोड येथे रस्त्यावर झाड पडण्याची स्थिती असल्याने नगरपालिका विभागाने झाड तोडले आहे. मुरगवाडा येथील नंदकुमार चंदवणकर यांच्या घराच्या कंम्पाऊड वॉलचे समुद्राच्या लाटांमुळे अंशत: नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here