ओबीसी आरक्षणासाठी माहिती गोळा करण्याचे काम सुरु

0

रत्नागिरी : ओबीसी आरक्षणावरून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ओबीसी आरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातून माहिती गोळा करण्यात येत आहे. 1960 पासूनची जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची माहिती गोळा करून ती माहिती मागासवर्ग आयोगाला प्रशासनामार्फत पाठवण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या माहितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने निवडणुकीसाठी पात्र असणार्‍या नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि अन्य निवडणुका राज्य सरकारने 6 महिन्यांसाठी पुढे ढकलल्या आहेत. दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षणाचा कोटा निश्चित करण्यासाठी 1960 पासून झालेल्या निवडणुकामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि राजकीय संस्थांमध्ये कोणत्या प्रवर्गाला किती जागा होत्या. त्यात प्रवर्गनिहाय किती उमेदवार निवडून आले याची माहिती संकलीत करण्याचे जिल्हा परिषद, 9 पंचायत समिती व 846 ग्रामपंचायतीमध्ये काम सुरु होते. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संकलीत माहिती प्रशासनाने मागासवर्ग आयोगाला सादर केली आहे.

मागासवर्गीय आयोगाच्या आदेशानुसार सन 1962 ते 1994 या कालावधीमधील सदस्यांची माहिती गोळा करताना प्रशासनामधील अधिकार्‍यांची दमछाक झाली. सदस्यांची माहिती शोधताना जुने रेकॉर्ड शोधावे लागले तर विविध ठिकाणाहून माहिती संकलीत करताना जिल्हा परिषद व शाळा व विद्यालयातील दाखल्यांचा आधारही घ्यावा लागला. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे 1962 पासूनच्या सदस्यांचे रेकॉर्ड परिपूर्ण झाले आहे. मात्र ही सर्व माहिती गोपनीय असल्याने देता येत नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतीमध्ये 1960 पासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,खुल्या प्रवर्गातून किती सदस्य निवडून आले आहेत. त्या प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांची माहिती घेण्यात येत आहे. मात्र ही माहिती संकलन करताना अनेक अडचणी येत आहेत.

गेल्या 10 ते 15 दिवसांपासून जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग ही माहिती संकलीत करण्यात व्यस्त आहे. 1960 म्हणजे गेल्या 63 वर्षांत निवडणूक झालेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमधील आरक्षणनिहाय सदस्यांची माहिती संकलीत करण्याचे दिव्य काम सुरू आहे. सर्वग्रामपंचायतीची एकत्रीत माहिती संकलीत झाल्यानंतर ती मागासवर्ग आयोगाला पाठवण्यात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:32 PM 28-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here