चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या ३० एप्रिल व १ मे रोजी शाखातंर्गत क्रिकेट स्पर्धा

0

चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था ही एक महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था आहे. या संस्थेच्या रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ५० शाखा कार्यरत आहेत.

या ५० शाखांमध्ये जवळपास २४५ हुन अधिक कर्मचारी व ६८ हुन अधिक अल्पबचत प्रतिनिधी, ४९ सराफ व ७५० समन्वयक कार्यरत असून अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम करणारा वर्ग म्हणून या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा नाव लौकिक आहे. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी संस्थेमार्फत चांगले वेतन दिले जात असतानाच त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असताना त्यामध्ये चांगल्या कामाचे कौतुक करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असताना त्यामध्ये सर्वोत्कृष्ठ काम करणारे तीन शाखाधिकारी, सर्वोत्कृष्ठ काम करणारे तीन वसुली कर्मचारी यांचा खास यथोचित सत्कार करणे, सर्व कर्मचाऱ्यांना चांगल्या कामाबाबत वर्षात एकुण चार पगार भेट म्हणून देण्यात येत असतात.

अशा पद्धतीने त्यांचे कौतुक करीत असतानाच आपल्याला सिद्ध करण्यासाठी सांघीक पद्धतीने क्रिडा स्पर्धात सामिल होऊन यशस्वी होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करुन यशस्वी होण्यासाठी जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी यासाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करत असते. दि. ३० एप्रिल व १ मे रोजी या कालावधीत संस्थेच्या सात विभागाच्या शाखांतर्गत कर्मचाऱ्यांच्या आठ संघामध्ये क्रिकेट स्पर्धांचे तसेच कर्मचारी संघ विरुद्ध संचालक मंडळ संघ अशा लक्षवेधी सामन्याचे दि. १ मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा क्रिकेट क्षेत्रातील क्रिडापटुना व क्रिकेटची आवड असणाऱ्या क्रिडा रसिकांना एक प्रकारचे आकर्षण असेल.

या स्पर्धा चिपळूण नगरपालिकेच्या पवन तलावावरील स्टेडीअमवर ३० एप्रिल व १ मे रोजी संध्याकाळी ठिक ५ वाजता सुरु होणार असून रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहेत. विजेत्या संघ‌ाला व उपविजेता संघाला आकर्षिक शिल्ड देण्यात येणार आहे. संस्थेच्या नाविन्यपुर्ण उपक्रमास क्रिडा रसिकांनी व संस्थेच्या चाहत्यांनी उपस्थित राहुन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन चिपळूण नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here