मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपपरिसरातील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

0

◼️ रत्नागिरीतील चार प्रकल्पांना दिल्या विद्यार्थ्यांनी भेटी

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपपरिसराच्या पद्व्युत्तर प्राणीशास्त्र विभागाने क्षेत्रभेटीचं आयोजन केलं होतं या भेटीत नेवरे येथील कोळंबी प्रकल्प, गावखडी येथील कासव संवर्धन केंद्र, पिंजरा मत्स्यशेती प्रकल्प, कालवं प्रकल्प आणि मरीन बायोलॉजीकल रिसर्च या चार ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व प्रथम तसेच द्दितीय वर्षाचे एकुण २२ विद्यार्थी या क्षेत्रभेटीस उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिक ज्ञान मिळण्याच्या उद्देशाने आयोजित या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांना कोळंबी शेती म्हणेज काय,त्याला येणारा खर्च, कोळंबी प्रकल्पातून होणारा नफा, तसेच कोळंबी प्रकल्प कसा केला जातो..कोळंबी प्रकल्पासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, मार्केटिंग व्यवस्थापन, हार्वेस्टिंग अशा अनेक गोष्टींबाबत माहिती देण्यात आली नेवरे येथील कोळंबी प्रकल्पाचे संचालक यांनी याबाबत विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले.

क्षेत्रभेटीच्या दुस-या दिवशी विद्यार्थ्यांनी गावखडी येथील कासव संवर्धन केंद्रास भेट देऊन अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले समुद्रात कशा प्रकारे सोडतात हे प्रत्यक्ष पाहिलं ही य़ा क्षेत्रभेटीसाठी कांदळवन कक्ष रत्नागिरी क्षेत्रपाल राजेंद्र पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं. कासव संवर्धनाचे अवितर काम करणा-या प्रदीप डिंगणकरांनी कासवांच्या प्रजाती. प्रजनन काळ, मृत्यूदर, अंड्यातून जन्माला येणा-या नर मादीचं प्रमाण व त्यांच्या तापमानाशी असलेला संबंध व कासव संवर्धनाची गरज का आहे याची सविस्तर माहिती दिली. तसेच गावखडी गुरववाडी येथील पिंजरा मत्स्यशेती प्रकल्पाला देखील विद्यार्थ्यांनी यावेळी भेट दिली यावेळी जिताडा माशांचं संगोपन कसं केलं जातं आणि पिंजरा मस्त्यशेतीतून कसा फायदा होतो याची माहिती उपजिवीका तज्ञ वैभव बोंबले यांनी दिली.

क्षेत्रभेटीच्या शेवटच्या टप्प्यात रत्नागिरीतील सागरी जैविक संशोधन केंद्रातील मस्त्यालय व म्युझियम ला भेट देऊन विविध शोभिवंत माशांचे तसेच जतन करून ठेवलेल्या प्राण्यांचे विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले यावेळी मरीन बायोलॉजीकल रिसर्च सेंटरचे पागारकर यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्राणिशास्त्र – समुद्र विज्ञान शास्त्रच्या विद्यार्थ्यांनां प्रत्यक्ष फिल्डवरचे ज्ञान व अनुभव मिळण्याच्या हेतूने या क्षेत्रभेटीचं आयोजन करण्यात आलं होतं या विद्यार्थ्यांना रत्नागिरी उपपरिसाचे प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर, प्रभारी कुलसचिव अभिनंदन बोरगावे तसेच प्रा. आरती दामले, तौफिन पठाण, सोनाली मेस्त्री यांचं मार्गदर्शन लाभलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:30 PM 28-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here