दापोली-खेड-मंडणगड शहरातील पहिल्या टप्प्यात साडे सहा कोटींची विकास कामे मंजूर : आ. योगेश कदम

0

दापोली : दापोली शहरातील नगरपंचायत हद्दीतील तब्बल तीन कोटी पन्नास लाख रुपयांची तर मंडणगड नगरपंचायतीसाठी एक कोटी पन्नास लाख तर खेड नगरपरिषदेच्या हद्दीतील दीड कोटी अशी एकूण तब्बल साडेसहा कोटी रुपयांची विविध विकास कामांसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी मंजुरी केला आहे लवकरच ही विकासकाम सुरू होतील अशी माहिती दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.तर लवकरच आणखी पाच कोटी रुपयांच्या विकासनिधीला मंजुरी मिळेल अशीही माहिती आमदार कदम यांनी दापोलीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रदीप सुर्वे, उन्मेश राजे, निलेश शेठ,मधुकर दळवी, सचिन जाधव, ममता शिंदे,स्वप्निल पारकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंजूर झालेल्या विकास कामांची मागणीपत्र व वॉर्ड निहाय यादीच त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. त्यामुळे आता नगरपंचायत निवडणूकित कोणतेही राजकारण विरोधकांकडून करण्यात आले असले तरी शहरातील विकासकामांची मंजुरी व त्यासाठी प्रयत्न आपण कोणतेही राजकारण दापोली विधानसभा मतदारसंघातील विकासकामातही करत नाही असे स्पष्ट संकेत आमदार योगेश कदम यांनी दिले आहेत.दरम्यान ही सगळी विकासकामे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली होणार असून तसे आदेश नगरविकास खात्याकडून देण्यात आले आहेत अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली.ऊत्तम दर्जेदार विकास कामांची पूर्तता आपल्याला अपेक्षित असून चांगल्या प्रकारे ही काम वेळेत पूर्ण कशी होतील याकडे आपण लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दापोली,मंडणगड व खेड तालुक्यातील मंजूर झालेल्या यादीत पुढील कामांचा समावेश आहे. दापोली नगरपंचायत हद्दीतील कोकंबाआळी सार्वजनिक विहोर -गद्रे पूल- मारुती मंदीर नाला २ कोटी चॅनलाईन करणे, दापोली नगरपंचायत हद्दीतील शिवाजीनगर लाल कट्टा ते वालावालकर घर नाला चॅनलाईज करणे १.५० कोटी या दोन कामांसाठी तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.

खेड नगरपरिषद हद्दीमधील पुढील अकरा कामांचा समावेश आहे. हनुमान पेठ पाथरजाई मंदोर ते गांधी चौक गटार बांधणे रस्ता डांवरीकरण करणे,सानेवरती डांबरीकरण करणे.खंड समर्थ नगर कर्मचारी वसाहत गटार व रस्ता डांबरीकरण करणे,वरवटकर संकूल खेड वाचनालय रस्ता डांबरीकरण करणे, हनुमान मंदीर बाजारपेठ भूगरी स्टारावर स्तंब टाकणे. मेरी भवानी नगर पाईप लाईन टाकणे,मदिना चौक ते सामजिद चौक पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे,खेमजाई मंदीर ते नारंगी विसजन घाट पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे,समर्थ नगर कमानी पासून परकार चाळ पर्यंत व अंतर्गत रस्ते करणे,डांबरीकरण करणे, शेखर तलाठी यांचे घरापासून मोहिमतुले यांचे घरापर्यंत गटार बांधणे या कामांचा समावेश आहे. तर मंडणगड येथील दीड कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या तीनही तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कामांच्या नावा यादीसहीत मागणी पत्र मंजूर विकास कामांची यादीच आमदार योगेश कदम यांनी दापोलीत पत्रकार परिषदेत सादर केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:30 PM 28-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here