रत्नागिरी : आज शुक्रवारी नमाज अदा करण्यास आलेल्या सर्व मुस्लीम समाजामध्ये करोना बाबत जागृती करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी मोठ्या संखेने मशिदींमधून एकत्र न येता वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांनी एकत्र येत नमाज अदा करावी असे आवाहन प्रत्येक मशिदीतून करण्यात आले. तसेच या रोगापासून सर्वांना लवकरात लवकर मुक्ती मिळावी अशी प्रार्थना देखील करण्यात आली. आता या पुढे मुस्लीम समाजाने या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व नियम पाळावेत असे आवाहन मुस्लीम समाजाचे जेष्ठ नेते अलीमिया काझी यांनी केले आहे.
