रत्नागिरीत ‘मनसे’च्या वतीने होणार हनुमान चालीसा पठण

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मनसेच्यावतीने 3 मे रोजी रत्नागिरी शहरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांसह संलग्न असणार्‍या इतर वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

हनुमान चालीसा आणि महाआरती करण्यासाठी मनसेकडून शहर पोलिसांकडे ध्वनीक्षेपक लावण्याची परवानगी मिळण्यासाठी अर्जही करण्यात आला आहे.

मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रदेश सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांच्या नेतृत्वाखाली हनुमान चालीसा पठण आणि महाआरती केली जाणार आहे. 3 मे रोजी सकाळी 8.30 वा. मांडवी समुद्रकिनारी असणार्‍या जोंधळ्या मारुती मंदिराजवळ आणि सकाळी 11 वा. मारुती येथील हनुमान मंदिराजवळ हा कार्यक्रम केला जाणार आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील प्रत्येक समाजाला वेगळा न्याय लावता येणार नाही, असे पत्रकार परिषदेत सांगितले. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी राज्यातील आपल्या पदाधिकार्‍यांना महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्‍यांच्या बैठकीत येत्या मंगळवारी हा कार्यक्रम ठरवला आहे. त्यासाठी लावण्यात येणार्‍या ध्वनीक्षेपकाची परवानगी मागण्यात आली आहे.

शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांना याबाबतचे निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देतेवेळी जिल्हाउपाध्यक्ष अविनाश सौंदळकर, चिटणीस सुनील साळवी, जिल्हासंघटक रुपेश जाधव, मनविसे जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, लांजा तालुकासचिव मनोज देवरुखकर, तालुका संघटक प्रकाश गुरव, जयेश दुधरे, विभागअध्यक्ष सचिन कामेरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:06 AM 29-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here