‘आशादीप’च्या मदतीसाठी आज प्रबोधन कार्यक्रम

0

रत्नागिरी : मतिमंद मुलांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या आशादीप संस्थेच्या मदतीसाठी सप्त खंजिरी वादनातून सामाजिक प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम शुक्रवार, दि. २९ एप्रिल रोजी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रात्री ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती या संस्थेतर्फे दिलीप रेडकर, विलास कोळपे, विजय पवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोणतेही शासकीय अनुदान न मिळताही, सामाजिक जाणिवेतून मतिमंद मुलांच्या पालकांनी रत्नागिरीत आशादीप या नावाने निवासी कार्यशाळा सुरू ठेवली आहे. आर्थिक मदत करणाऱ्या दात्यांच्या सहकार्यावरच या संस्थेचे कार्य सुरू आहे. वसतिगृहाच्या मदतीकरिता कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

सत्यपाल महाराज राष्ट्रीय प्रबोधनकार असून कीर्तनात त्यांचा देहदान, नेत्रदान, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, संविधान संवर्धन, धर्मनिरपेक्षता यावर भर असतो. या कार्यक्रमाचा लाभ घेऊन ‘आशादीप’च्या कार्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी नितीन मुझुमदार, चंद्रमोहन देसाई, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 29-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here