गणेशगुळे समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळला डॉल्फिन

0

पावस : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्र किनारी डॉल्फिन मासा मृतावस्थेत सापडून आला.

पोलिसपाटील संतोष लाड तसेच चिन्मय रांगणकर यांच्या नजरेस हा मासा पडल्यानंतर त्याला जीवदान देण्याच्या उद्देशाने येथील तरुणांनी काही प्रमाणात प्रयत्न केला. परंतु डॉल्फिन मासा सुमारे आठ ते दहा फूट लांबीचा व दीडशे ते दोनशे किलो वजनाचा असल्याने त्याला बाजूला करणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्याला जखमी अवस्थेत जीवदान देणे कठीण बनले. मासा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. अखेर रात्री आलेल्या समुद्राच्या भरतीमध्ये हा मासा पाण्यात गेला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:08 AM 29-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here