दुचाकी-ट्रक भीषण अपघातात तरुण जागीच ठार

0

रत्नागिरी: दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात देवरुखमधील तरुण जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी संध्याकाळी 4:30 वा. च्या दरम्यान संगमेश्वर-देवरुख मार्गावरील साडवली येथील वनाझ कंपनीजवळ घडला. सुखराज प्रभाकर मोरे असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुखराज मोरे हा संध्याकाळी त्याची ड्युटी असल्याने तो आपल्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एमएच 08-एयु-5947 ही घेऊन साडवलीच्या दिशेने निघाला होता. त्याच रस्त्यावर प्रवास करणाऱ्या फाडी वाहतूकीचा ट्रक क्रमांक एमएच 08-9952 याने वनाझ कंपनीशेजारील रस्त्यावर आतमधे टर्न मारला. याचवेळी ट्रक आणि मोटारसायकलची धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती कि सुखराजच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. यात तो जागीच ठार झाला.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here