शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

0

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी सलग दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार दि. ३० एप्रिलपर्यंत शाळा नोंदणीसह विद्यार्थ्यांना माहिती प्रपत्र, आवेदनपत्र सादर करण्याची संधी मिळणार आहे, तर दि. २ मेनंतर शुल्क भरता येणार नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.

दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षावपूर्वमाध्यमिकशिष्यवृत्तीपरीक्षा घेतली जाते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरतात. शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात गुणवत्ता यादीत येणाऱ्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत दरमहा १०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते, तर आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे म्हणजेच दहावीपर्यंत दरमहा १५० रुपये शिष्यवृत्ती मिळते.

दरम्यान, शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. परीक्षेविषयी अधिक माहिती परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:04 PM 29-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here