मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; एक ठार

0

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर दोन कारमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जगदीश बाळकृष्ण मसुरकर (वय ६१, रा. मालाड-मुंबई) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना गुरुवार (दि.१९) दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास महामार्गावर कोंडमळा येथे घडली. याबाबत संदीप तुकाराम शिंदे (५०, रा. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातात नीलेश मोहन गडकरी, श्रद्धा जगदीश मसुरकर, अभिषेक जगदीश मसुरकर, विद्या जगदीश मसुरकर, संदीप सुधाकर शिंदे, अरुण अनंत शिंदे, वैशाली किशोर काकडे प्रवासी जखमी झाले आहेत. याबाबत सावर्डे पोलिसांत दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, चालक नीलेश गडकरी हे आपल्या ताब्यातील सुझुकी बलीनो कार घेऊन मालवण तालुक्यातून मुंबईकडे जात असता ही गाडी कोंडमळा येथे आली. यावेळी चिपळूणहून सावर्डेकडे जाणारी ब्रेझा गाडी संदीप शिंदे घेऊन येत होते. बेदरकारपणे गाडी चालवून उजव्या बाजूला ब्रेझा गाडी गेली व समोरून येणाऱ्या बलीनोवर आदळली. या अपघातात एकजण ठार झाले असून अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here