दापोलीमध्ये १३ जण होम क्वॉरंटाईन

0

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व परदेशातून आलेल्या अशा एकूण तेरा जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे तर अन्य आठजणांना देखरेखीखाली (निजंतुकिकरण वॉर्ड) स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णाच्या संपर्कात आलेला ड्रायव्हर दाभोळ येथे घरभरणीसाठी आला होता. त्या ड्रायव्हरसह संपर्कात आलेल्या कुटुंबातील काहींना सुरक्षा व खबरदारीचा उपाय म्हणून स्वतंत्र कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी सर्व आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, मुख्याधिकारी महादेव रोडगे, तालुका आरोग्य अधिकारी आदी अधिकारी या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, या सगळ्यासाठी पथके नेमण्यात आली असून कोणीही व्यक्ती परदेशातून आली असेल तर त्याची माहिती तत्काळ प्रशासनाला देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दापोलीमध्ये ५० बेडचा कक्ष निर्माण करण्यात आला असून त्या ठिकाणी सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत अशी माहिती दापोली तहसीलदार समीर घारे यांनी दिली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here