चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील हॉटेल अभिरूची समोर बुधवारी (दि.१८) रात्री ११ वा. एस.टी. बस व कारचा अपघात होऊन दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. यानुसार डॉ. वर्षा विजय रीळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत एस.टी. चालक सिद्धार्थ ताजणे (रा. मंडणगड) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार मंडणगड-कोल्हापूर बस घेऊन ते चिपळूणच्या दिशेने येत असता डॉ. वर्षा रीळकर आय-२० कार घेऊन बहादूरशेख चौकाच्या दिशेने जात होत्या. यावेळी त्यांची कार एसटी बसवर धडकली. कारमधील एअर बॅगमुळे डॉ. रीळकर या बचावल्या. अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास हे. कॉ. मनीष कांबळे करीत आहेत.
