“निर्भयाला न्याय मिळाला आता प्रतीक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळण्याची” – खा. छत्रपती संभाजीराजे

0

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात बळी पडलेली निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना अखेर 2650 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला आहे. चौघा आरोपींना आज तिहार जेलमध्ये एकाच वेळी फाशी देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता प्रतीक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळावा, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला केली आहे. देशातील सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारी ही घटना आहे. कोपर्डीचे बलात्कारी नराधम सुद्धा लवकरात लवकर फासावर लटकले पाहिजेत. त्यासाठी राज्यसरकारने प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here