देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस

0

नवी दिल्ली- केंद्र सरकारकडून कलम 370 हटविल्यानंतर सर्व स्तरातून मोदी सरकारचं कौतुक केलं जात आहे. देशाच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. 370 कलम हटविल्यामुळे जम्मू काश्मीर खऱ्या अर्थाने भारताचा अविभाज्य भाग होणार आहे. त्यामुळे काश्मीर हे सुरक्षित, प्रगतशील राज्य म्हणून उभं राहू शकेल असा विश्वास शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एनडीएसाठी अभिमानास्पद असा हा क्षण आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संसद आणि जनतेचे अभिनंदन करतो. यासाठीच आम्ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या नेतृत्वात एनडीएला पाठिंबा दिला होता. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाख नव्या उभारणीसाठी मी प्रार्थना करतो. त्या राज्यातील नागरिकांना फायदा होणार आहे. राज्यात शांतता, प्रगती आणि भरभराट होईल. वर्षोनुवर्षे रखडलेला प्रश्न सुटला आहे अशी प्रतिक्रिया आदित्य यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here