अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू

0

राजगुरूनगर, पानमळा (ता. खेड) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना काल (दि. १९) सायंकाळी साडे आठच्या दरम्यान घडली. पुणे-नाशिक महामार्गावर काल संध्याकाळी खेड घाटाच्या नजीक गुपितबाबा मंदिराच्या जवळ (पानमळा) परिसरात बिबट्या रस्ता ओलांडत असताना, त्याचवेळी बिबट्याला वाहनाची जोरात धडक बसली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचा वनविभाग अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here