‘संकटाच्या काळात तरी तुमचं राजकारण ‘होम क्वारंटाईन’ करा’ – रोहित पवार

0

सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गरज नाही, तर अनुभवी देवेंद्र फडणवीस यांची गरज असल्याची टीका भाजप नेते निरंजन डावखरे यांनी केली होती. कोरोना विरोधातील लढाई देवेंद्र फडणवीस यांनी अधिक सक्षमपणे हाताळली असती, असं त्यांनी म्हटलं होत. आता निरंजन डावखरे यांच्या याच वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कर्जत-जमखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी डावखरे यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. ‘राजकारण आम्हालाही करता येतं, पण आज ती वेळ नाहीय. संकटाच्या काळात तरी तुमचं राजकारण ‘होम क्वारंटाईन’ करा. तुमचा एवढा अभ्यास व अनुभव असेल तर मदत करायला तुम्हाला अडवलं कुणी?’ असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here