माखजन प्रशालेत शिक्षक प्रशिक्षण शिबीर संपन्न

0

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन,अँड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूल च्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

प्रशिक्षणासाठी ज्ञानप्रबोधिनी पुणे चे ज्येष्ठ शिक्षक,प्रशिक्षक प्रशांत दिवेकर व रत्नागिरी च्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुरेंद्र ठाकूर देसाई उपस्थित होते.

दोन दिवस झालेल्या प्रशिक्षण शिबिरात प्रशांत ठाकूर देसाई यांनी अध्ययन अध्यापनात समाविष्ट होणाऱ्या प्रमुख बाबी उपस्थितांसमोर मांडल्या.बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार भविष्यात प्रत्येक शिक्षकाने स्वतः मध्ये कसे बदल केले पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केले.एखादा नवा आशय कसा शिकवावा,आशय खोलवर कसा समजून द्यावा,त्याचे उपयोजन विद्यार्थ्यांना कसे करायला सांगावे व त्यांनतर अध्यापनानंतर सिंहावलोकन का करावे याविषयी त्यांनी सांगितले.प्रभावी शिक्षकाकडे कोणते गुण असावेत हे ही स्पष्ट केले.

दुसऱ्या दिवशी गोगटे जोगळेकर चे उपप्राचार्य सुरेंद्र ठाकुरदेसाई यांनी सहअध्ययन याविषयी मार्गदर्शन केले.एखादा आशय शाळेबाहेर कसा प्रभावीपणे शिकवू शकतो हे विविध उदाहरणातून स्पष्ट केले.

समारोपाच्या कार्यक्रमात संस्था अध्यक्ष आनंद साठे यांनी शिक्षक प्रशिक्षण शिबिरा मागची भूमिका स्पष्ट केली.यावेळी मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर सहसचिव पराग लघाटे, इंग्लिश मीडियम च्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत, महादेव शिंदे आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला खजिनदार श्री संदेश पोंक्षे, श्री सुबोध फणसे, श्री मुसळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार नामजोशी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here