दिवसाढवळ्या अज्ञाताकडून दुचाकीची चोरी

0

राजापूर शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाबाहेर पार्क केलेली दुचाकी दिवसाढवळ्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे. केशव शंकर बंदरकर हे बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान भूमी अभिलेख कार्यालयात आले असता त्यांनी आपली दुचाकी अॅक्टीव्हा कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर उभी करून ठेवली होती. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास कामकाज संपल्यानंतर ते दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी आले असता दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली, मात्र कोठेही दुचाकी आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी राजापुर पोलीस स्थानकात तकार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे करत आहेत. राजापूर शहरात दिवसा-ढवळ्या दुचाकीची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here