महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रत्नागिरी शहरातील सर्व बस थांबे स्वच्छ धुऊन काढले

0

रत्नागिरी : कोरोना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून आज रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरांमध्ये जास्त प्रमाणात नागरिक बसची वाट बघत असतात असे सर्व बस थांबे झाडून, फिनेल-डेटॉल टाकून स्वच्छ धुऊन घेण्यात आले. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ, जिल्हा परिषद, माळनाका, मारुती मंदिर, शिवाजीनगर परिसरातील सर्व बस थांबे स्वच्छ करण्यात आले. यावेळी मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष श्री. रुपेश रघुनाथ सावंत, शहराध्यक्ष श्री. सतीश राणे, महिला शहराध्यक्ष सौ. अंजली सावंत, उपशहर अध्यक्ष श्री. सिद्धेश धुळप, श्री. आनंद शिंदे, श्री. जितेंद्र जाधव, श्री. अमोल श्रीनाथ, विभाग अध्यक्ष श्री. सर्वेश जाधव, श्री. नयन पाटील या सर्वांनी विशेष मेहनत घेतली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here