आमदार सदाभाऊ खोत यांची राजापूरातील गोवळ गावाला भेट

0

राजापूर : जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाच्या माध्यमातुन कोकण दौऱ्यावर आलेल्या रयत क्रांती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी शनिवारी राजापूर तालुका दौऱ्यात राजापूरातील गोवळ गावाला भेट देत तेथील शेतकऱ्यांच्या बांधावर आणि शेतात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.

या भेटीत त्यांनी गोवळ गावातील वांगी, भोपळा, भातपिकासह, नारळ, फोफळी व अन्य पिकांची पहाणी करत भविष्यात या उत्पादीत मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

शनिवारी राजापूर तालुका दौऱ्यावर आलेल्या आ. खोत यांनी गोवळ गावात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधला. गोवळ गावचे प्रगतशील शेतकरी अनिल शेवडे, मनोज परांजपे, प्रभाकर टेमकर, चंद्रकांत मराठे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घेतलेल्या विविध पिकांची पहाणी करत आ. खोत यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी या ठिकाणी वांगी, भोपळा, मिरची, भातपिकांसह अन्य पिकांची खोत यांनी पहाणी केली.

यावेळी शेतकऱ्यांनी उत्पादीत मालाला बाजारपेठ नसल्याने योग्य भाव मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. तर माकड आणि जंगली जनावरांपासून पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त असल्याचे सांगितले. तर खाडीचे पाणी भरून पावसाळयात शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान होत असल्याचे यावेळी सांगितले. तर गोवळ विल्ये पुलाच्या मागणीला न्याय न मिळाल्याने पावसाळयात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन होडीतुन पलिकडे विल्ये गावात शाळेत जावे लागत असल्याचे सांगितले.

यावेळी आपल्या प्रश्नांना नक्कीच आपण शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन आ. खोत यांनी यावेळी दिले.

यानंतर आ. खोत यांनी गोवळ ग्रामपंचायतीला भेट दिली. याप्रसंगी गोवळ सरपंच अभिजित कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष अभिजित गुरव, उपाध्यक्ष राजा काजवे, अरवींद लांजेकर, रवीकांत रूमडे, मोहन घुमे, निकम, संदेश विचारे, कृषी सहाय्यक शिंदे आदींसह भाजपा पदाधिकारी तसेच गोवळ गावचे शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच अभिजित कांबळे यांनी गोवळ गावातील समस्या मांडल्या व ग्रामपंचायतीच्या वतीने आ. खोत यांचा सत्कार केला.

याठिकाणी मार्गदर्शन करताना आ. खोत यांनी गोवळ गावातील प्रश्नाना न्याय देण्याचे आश्वासन दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:58 AM 02-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here