चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांचे संपर्क कार्यालय ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती आमदार निकम यांनी दिली आहे. जगभर कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण आढळला आहे. निकम यांच्या संपर्क कार्यालयात चिपळूण, संगमेश्वर आणि देवरूखमधील मतदार गावातील प्रश्न घेवून येतात. त्यामुळे निकमांच्या कार्यालयात नेहमीच गर्दी असते. खबरदारीचा उपाय म्हणून निकमांनी संपर्क कार्यालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
