कोकणात ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण वाढले

0

रत्नागिरी : नव्या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या महावितरणला ग्राहकांनी कॅशलेस वीज बिल भरण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे.

वर्षभरात कोकण विभागातील वीज ग्राहकांनी ७६९ कोटी ७८ लाख रुपयांचा ऑनलाईन भरणा केला आहे. गेल्या सात आठ वर्षापूर्वी ऑनलाईनद्वारे वीज बिल भरण्याचे प्रमाण नगण्य होते. ऑनलाईन वीजबिल भरण्यास ग्राहकांनी पसंती दिल्याने हे प्रमाण आजमितीस ५४ टक्क्यांपर्यंत वाढले. विशेषत: कोरोना काळात ऑनलाईनद्वारे वीज बिलांचा भरण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. ऑनलाईन वीजबिल भरीत असल्यास त्या ग्राहकाला वीजबिलाच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपये पर्यंत सट मिळते. ही बाब ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास महावितरण यशस्वी झाले आहे.

महावितरणने सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सर्व सेवा डिजिटल माध्यमांद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये सर्व वीज ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल पतसेच उच्चदाब ग्राहकांसाठी
स्वतंत्र RTGS सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे प्रामुख्याने दरमहा वीजबिलांचा भरणा ऑनलाईन करण्यासोबतच महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा देखील लघुदाब व उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहेत.

लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी १० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीज बिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणची अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल पची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे बिल भरणा, चालू व मागील वीज बिल पाहणे, पावती पाहणे, एकाच खात्यातून अनेक वीजजोडण्यांचे बिल भरणे यासह इतर सर्व ग्राहक सेवा उपलब्ध आहेत. वीज बिलावर छापलेला क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन करून ग्राहकांना यूपीआयद्वारे ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे.

तसेच ग्राहकांना वीज बिल भरण्यासंदर्भात नोंदणीकृत मोबाईल क्रमांकांवर पाठवण्यात येणाऱ्या एसएमएसमध्येही पेमेंटची लिंक देण्यात येत आहे. याबरोबरच भारत बिल पेमेंट सर्व्हिस, ईसीएस/ईबीपीपी/एनएसीएच, सेंट्रलाइझ्ड ग्रुप बिल पेमेंट, महापॉवरपे वॉलेट हेमार्गही ऑनलाईन पेमेंटसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव धनादेश बाऊन्स होणे, तो वटण्यास उशिर होणे किंवा अन्य अडचणी येणे आदी पूर्वीचे अडथळे पूर्णतः दूर झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:23 PM 02-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here