महाराष्ट्राची इटली होऊ द्यायची नसेल तर राज्यात ‘सरकारी कर्फ्यू’ जाहीर करावा – मनसे

0

मुंबई : ‘संपूर्ण राज्यात सरकारी कर्फ्यू जाहीर करावा’, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. आजपासून राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व खासगी ऑफिस आणि दुकानं 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सराकरने घेतला आहे. ‘महाराष्ट्राची इटली होऊ द्यायची नसेल आणि जर जनतेला केलेले ‘स्वयंशिस्ती’ चे आवाहन काम करणार नसेल, तर सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. गरज पडल्यास संपूर्ण राज्यात ‘सरकारी कर्फ्यू’ जाहीर करावा’, अशी मागणी ट्वीट करत आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here