मुलगा परदेशातून परतल्याची माहिती लपवल्या कारणाने सरकारी कर्मचाऱ्याचे निलंबन

0

बंगळूर : हिंदुस्थानात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोना पसरू नये म्हणून देशभरात खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांच्या चाचण्या केल्या जात आहेत. तसेच परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती द्या असे आवाहनही जनतेला करण्यात आले आहे. असे असतानाही पश्चिम रेल्वेच्या एका महिला अधिकारीने तिच्या मुलाच्या परदेश प्रवासाबाबत लपवून ठेवल्याने तिला निलंबित करण्यात आले आहे. बंगळुरू मध्ये राहणाऱ्या या महिला अधिकारीचा मुलगा काही दिवसांपूर्वी इटलीहून हिंदुस्थानात परतला होता. मात्र या कर्मचारीने तिच्या मुलाच्या परदेश प्रवासाबाबत माहिती दिली नव्हती. त्यानंतर आता तिचा मुलगा कोरोना बाधित झाला असून त्याला विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्या महिला अधिकारीला ही माहिती लपवल्या प्रकरणी रेल्वेने निलंबीत केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here