वेलदूर नवानगर शाळेच्या मेळाव्याला प्रतिसाद

0

गुहागर : तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्हा परिषद पर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदर नवानगर मराठी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळाव्याला पालक व ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला.

गावातुन ढोल-ताशांच्या गजरामध्ये रॅली काढण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते देवराम भोसले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सानिया वनकर, उपाध्यक्षा सुषमा रोहीलकर, सुरक्षा रोहीलकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, दिलीप पालशेतकर, सत्वशीला जगदाळे, पल्लवी घुले, अंजली मुद्दामवार, निलोफर शेख, अंगणवाडी शिक्षिका मत्स्यगंधा कोळथरकर उपस्थित होते. अंगणवाडी सेविका मत्स्यगंधा कोळपकर व सानिया नाटेकर यांनी प्रार्थना सादर केली.

विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. यापूर्वी शाळेची पालक सहभाग या विषयी राज्यस्तरीय शिक्षण वारीमध्ये मुंबई, कोल्हापूर, वर्धा, नांदेड, जळगाव याठिकाणी शाळेच्या स्टॉलची निवड करण्यात आली होती. पालक व ग्रामस्थ यांनी या मेळाव्या बद्दल समाधान व्यक्त केले. केंद्रीय प्रमुख अशोक गावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा झाला. सत्यशीला जगदाळे, पल्लवी घुले, अंजली मुद्दलवार, निलोफर शेख यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन सत्वशीला जगदाळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here