‘मनरेगा’च्या मजुरी दरात वाढ

0

रत्नागिरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (मनरेगा) मजुरी दर आता प्रतिदिन २५६ रुपये केले आहेत. कृषीसहित इतर सर्व विभागांमार्फत होणाऱ्या अकुशल कामांना सुधारित दरपत्रकाचा फायदा मिळेल.

सुधारित दराबाबत केंद्र शासनाची अधिसूचना २८ मार्चला जारी झाली. त्यानंतर राज्याच्या रोहयो आयक्तालयाने एक एप्रिलपासून राज्यभर सर्व जिल्ह्यांमध्ये मजुरी दर वाढविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

त्यामुळे जमिनीच्या विविध प्रकारांनुसार खोदाईचे प्रतिघनमीटर दरदेखील आता वाढविण्यात आलेले आहेत. हे दर १२५ रुपयांपासून ते ४९० रुपयांपर्यंत असतील. जनजाती क्षेत्र किंवा डोंगराळ क्षेत्रासाठी मजुरीचे खोदाईचे दर जास्त दिले जातात. विहीर खोदाईचे प्रतिघनमीटर दरदेखील आता १५६ रुपयांपासून ते ६१३ रुपयांपर्यंत करण्यात आले आहे.

खोदाईचे दर वाढविल्यामुळे विहीर खोदाई किंवा फळबाग लागवडीसाठी जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या पदरात अजून चांगली रकम पडू शकेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या फळबागांमध्ये केळी, ड्रॅगन फ्रूट, ॲव्हाकॅडो अशा नव्या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. वाढीव खोदाई दराचा तसेच सुधारित मजुरी दराचा लाभ आता या नव्या पिकांना होईल. त्यामुळे फळबाग लागवडीला चालना मिळण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:29 PM 02-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here