पतसंस्थांसाठी वर्ष अखेरीचे कामासाठी मुदत वाढवून देण्याची जिल्हा पतसंस्था फेडरेशनची मागणी

0

रत्नागिरी : सहकारी संस्थांची आर्थिक वर्षअखेर ही 31 मार्च रोजी असते या दिवशी सर्व आर्थिक पत्रके तयार केली जातात व वसुली ही पूर्ण केली जाते. मात्र या वर्षी सर्वावासमोर कोरोना या विषाणूजन्य आजाराचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. बहूतेक ठिकाणी दुकाने, व्यवसाय बंद ठेवावे लागत आहेत. शासनामार्फतही एकत्र न जमण्याचे व प्रवास न करण्याचे आवाहन केले जात आहे संस्थांचे वर्षअखेरीचे कामांवर याचा मोठा परिणाम होत आहे. काही जिल्हयांमध्ये मा. जिल्हधिकारी यांनी आदेश काढुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद केली आहे यामुळे संस्थांचे वसुलीचे काम अवघड झाले आहे. सोनेतारण कर्जाचेही लिलाव साधारणपणे वर्षअखेरीला केले जातात ते करणेही अवघड झाले आहे. संस्थाकडे सोनेतारण कर्जासाठी ग्राहकांची उपस्थिती वाढत असते लोकांचे एकत्रिकरण नको अशी शासनाची भुमिका आहे 25 टक्के सेवकवर्गाचीच उपस्थिती ठेवावी अशीही सुचना आहे अशा स्थितीत दररोज कार्यालयीन कामकाज करणे हे अवघड व आजाराचा विचार करता धोक्याचे ठरणारे आहे त्यामुळे पतसंस्थांनाही 31 मार्च पर्यंत कामकाज बंद ठेवावे अगर कसे याबाबतही शासनाने स्पष्ट निर्देश देणेही आवश्यक आहे. एकंदरीत परिस्थिती पहाता 31 मार्चअखेर थकबाकी राहीली अगर मोठ्या प्रमाणावर एन.पी.ए. खाती राहीली तर मोठी तरतूद करावी लागेल व संस्थांचे आर्थिक पत्रकांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. तरी सध्याची अभुतपूर्व स्थिती पहाता संस्थाची वर्षअखेर बदलून 30 एप्रिल केल्यास संस्थाना वर्षअखेरची कामे करण्यासाठी आधिकची मुदत मिळेल व संस्थांचे आर्थिक पत्रकांवरील ताणही कमी होईल तरी याचा विचार होउन आर्थिक वर्षअखेर 30 एप्रिल रोजी करण्यास परवानगी मिळावी अशी विनंती पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनाी सहकार आयुक्तांकडे केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here