ज्ञानदीप भडगावच्या केदार भावेला राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट’ पुरस्कार प्रदान

0

खेड : तालुक्यातील भडगाव येथील कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिर उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी वाणिज्यमध्ये शिकत असलेला केदार भावे याला महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट व गाईड यांच्यातर्फे दिला जाणारा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच प्रदान केला.

केदारला संतोष भोसले, महादेव वाघमोडे, शांतीलाल आव्हाड या स्काऊट मास्टरांचे मार्गदर्शन लाभले. केदारचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, नियामक मंडळाचे चेअरमन पेराज जोयसर, तसेच पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या नियामक मंडळाचे चेअरमन विनोद बेंडखळे, प्रशाला समितीचे चेअरमन भालचंद्र कांबळे, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा यांनी अभिनंदन केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 03-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here