अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रात मोठी उलाढालीची शक्यता

0

मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयाला घर खरेदी करणे किंवा गृहप्रवेश करणे शुभ समजले जाते. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता तसेच त्यांना आकर्षित करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी भरघोस सूट, आकर्षक पेमेंट योजना अशा ऑफर्स देऊ केल्या आहेत. याशिवाय सरकारी धोरण, गृहकर्जावरील कमी व्याजदर यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर रिअल इस्टेट क्षेत्रात सकारात्मक चित्र पाहायला मिळेल.

अनेकजण आपल्या ‘ड्रीम होम’चे स्वप्न पूर्ण करतील आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलाढाल होईल, अशी आशा शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी वर्तवली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:42 AM 03-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here