सदाभाऊ खोत यांची तुळसवडे गावाला भेट

0

राजापूर : जागर शेतकऱ्याचा आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत राजापूर तालुका दौऱ्यावर आलेल्या आमदार सदाभाऊ खोत यांनी तालुक्यातील तुळसवडे गावाला भेट दिली.

या गावासाठी आ. खोत यांनी मोठया प्रमाणावर विकास निधी दिला असून त्याचीही आ. खोत यांनी पहाणी केली. याप्रसंगी तुळसवडे ग्रामस्थांच्या वतीने आ. खोत यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

आ. खोत यांचे स्वीय सहाय्यक आदीनाथ कपाळे यांचे तुळसवडे हे गाव आहे. आपल्या गावच्या विकासासाठी कायमच आग्रही असणाऱ्या आदीनाथ यांनी आ. खोत यांच्या माध्यमातुन मोठया प्रमाणावर गावात विकास निधी आणला आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभुमिवर आ. खोत यांनी या गावात भेट दिली व पहाणी केली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात आ. खोत यांचे स्वागत करत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आ. खोत यांनी देखील गळयात ढोल घालत ढोल वादनाचा आनंद लुटला.

याप्रसंगी तुळसवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया आडीवरेकर, उपसरपंच संजय कपाळे यांसह ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. तर ग्रामस्थ संतोष आरावकर यांनी आ. खोत यांनी गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना आ. खोत यांनी भविष्यातही तुळसवडे गावाला आवश्यक तो विकास निधी दिला जाईल अशी ग्वाही दिली. याप्रसंगी आदीनाथ कपाळे यांनी गावातील कामांबाबत माहिती दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:31 PM 03-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here