‘मनसे’ची महाआरती आज

0

खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडतर्फे अक्षय्य तृतीयेनिमित्त ३ रोजी आयोजित करण्यात आलेली महाआरती स्थगित करण्यात आली असून बुधवार, दि. ४ रोजी सायंकाळी ७ वा. महाआरती श्रीसिद्धिविनायक मंदिर येथे होणार आहे,
अशी माहिती मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना खेडेकर म्हणाले, राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दि ३ रोजीची महाआरती स्थगित करण्यात आली असून आता वैशाख शु. तृतीया बुधवार, दि. ४ रोजी हिंदुधर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहर्त असलेला शुभमुहर्त अक्षयतृतीया निमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सर्व हिंदू बंधू-भगिनीनी उपस्थित रहावे, असे आवाहन खेडेकर यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:09 AM 04-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here