नवनीत राणा यांना जे.जे. रुग्णालयात हलविले

0

मुंबई : राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहे. आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. त्यांना जेल मिळते की बेल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, नवनीत राणा यांना स्पॉंडिलायसिस असून त्यांच्या जीवाला काही झालं तर तुरुंग अधिकारी जबाबदार असतील, असं पत्र राणांच्या वकिलांना भायखळा तुरुंग अधीक्षकांना लिहिलं होतं. त्यानंतर आज नवनीत राणांची प्रकृती खालावली असून त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात आता रुग्णालय प्रशासनाकडून महत्वाची माहिती समोर येतेय.

नवनीत राणा यांना जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आलं. नवनीत राणांच्या वकिलांनी सोमवारी तुरुंग अधीक्षकांना दिलं होतं. ज्यामध्ये नवनीत राणा यांना स्पॉंडिलायसिसचा आजार आहे. तुरुंगात आणले, तेव्हापासून त्यांना जमिनीवर झोपायला लावले आहे. त्यामुळे त्यांचा आजार बळावला आहे. आम्ही अनेकदा तपासणीची मागणी केली. पण, आमच्याकडे दुर्लक्ष कऱण्यात आले. त्यांच्या जीवाला काही झालं तर संपूर्ण जबाबदारी तुरुंगाची असेल, असं लिहलं होतं. या अर्जाची प्रत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना देखील पाठविण्यात आली होती. नवनीत राणांच्या कंबरेचं दुखणं वाढलं असून त्यांना उपचारासाठी गरज आहे, असं वकिलांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज नवनीत राणा यांना जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. मात्र आता रुग्णालय प्रशासनाकडून महत्वाची माहिती समोर येतेय.

नवनीत राणांच्या प्रकृतीबाबत रुग्णालय प्रशासन म्हणाले…
नवनीत राणांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्पॉंडिलायसिस त्रास असल्यास राणांवर उपचार होणार आहेत, यानुसार जे जे रुग्णालयातील सीटी स्कॅन, एमआरआय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. इतर ऑर्थोच्या तक्रारी असतील, तर त्या देखील त्यांच्या तक्रारीनुसार उपचार करण्यात येणार असल्याची जे जे रुग्णालय प्रशासनाने माहिती दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:00 AM 04-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here